भंडारा येथील अरोमिरा कॉलेजमध्ये INC सोबत फसवणूक...


१८ विद्यार्थीनि परिक्षेपासून वंचित , एक वर्ष जाणार वाया


विद्यार्थिनींची कॉलेज च्या पुरुष कर्मचाऱ्या कडून पिळवणू व अभद्र वागणूक पत्र परिषदेत विद्यार्थीनिनी केला आरोप




बात्मी संकलन सुमीत ठाकरे 

 शहरातील रमाबाई आंबेडकर येथील अरोमिरा स्कुल ऑफ नर्सिंग येथे द्वि वर्षीय ए. एन.एम.नर्सिंग ला क्षमते पेक्षा जास्त विद्यर्थिनींना प्रवेश देऊन फक्त  शुन्य अटेंडन्स विद्यार्थ्यांना चालू सत्रात परिक्षेला परवानगी दिली . मात्र 18 विद्यर्थिनींना नोंदणी न करता चालू सत्रात परीक्षेला परवानगी न देता त्यांची फसवणूक केल्याची तक्रार अन्यायग्रस्त विद्यार्थीनिनी ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन जिल्हा कौन्सिल भंडारा यांचे कडे केली असून ए आय एस एफ चे राज्य सचिव काम्रेड वैभव चोपकर यांनी पत्रपरिषदेत सदर नर्सिंग कॉलेजचा काळा चीठठा पत्रकारांसमोर उघड केला आहे. या सर्व प्रकरणाची तक्रार भंडारा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आलीअसल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली आहे.   18 आगस्ट रोजी शासकीय विश्राम भवन येथे ए. आय. एस. एफ.च्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन अरोमिरा नर्सिंग कॉलेज व्यवस्थापनाने केलेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवत पत्रकारांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देऊन दुसऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये समायोजन करण्याची मागणी केली जेणेकरून आमचा एक वर्ष वाया जाणार नाही. एवढे नव्हे तर कॉलेज च्या आतापर्यंत च्या विद्यार्थनीनवर झालेल्या अन्याय व फसवणुकीचा पाढाच वाचला . या वेळी अन्यायग्रस्त विद्यार्थिनी नी सांगितले अरोमिरा कॉलेज ऑफ नर्सिंग प्रवेशासाठी संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र मोठमोठे बॅनर, होर्डिंग्ज लावून अनेक सुविधा युक्त व सु -सज्ज इमारत असल्याचा गवगवा करून ग्रामीण भागातील विद्यार्थीनिना प्रवेश घेण्यासाठी आमिष दाखविले प्रत्यक्षात मात्र या कॉलेजमध्ये तसे काही नसून नुसता फसवणुकीचा हा फंडा असल्याचे ही मुलींनी सांगितले भंडारा, गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अगदी गरीब घरातील विद्यार्थीनिनी या आमिषाला बळी पडून या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला व त्यांची या प्रकारे फसवणूक केल्या गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले . एकाच इमारती मध्ये तीन वेगवेगळे कोर्सेस ए. एन. एम.,जी. एन.एम. व बी. एस .सी. नर्सिंग एकाच वेळी घेतल्या जातात. व जागा पुरेशी नसल्याने प्रथम वर्ष पूर्ण न झालेल्या नवख्या मुलींना सरावाच्या नावाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जात असल्याचे ही मुलींने यावेळी सांगितले. शिकविण्यासाठी नियमानुसार प्रशिक्षित शिक्षक वर्ग नसल्याने दुसऱ्या एका नर्सिंग कॉलेज मधील बी. एस .सी. नर्सिंग च्या विद्यार्थीनिंना शिकविण्यासाठी बोलाविले जात असल्याचा आरोपही विद्यार्थीनींनी केला.ऑक्टोबर 2022 मध्ये ए.एन. एम. कोर्स ला प्रवेश घेतलेल्या त्या 18 विद्यार्थीनिंना 14 आगस्ट 2023 रोजी परीक्षेला परवानगी नाकारल्या चे कळले . या संबंधी या विद्यार्थीनिंनि कॉलेज व्यवस्थापनाला विचारले असता त्यांनी तुम्ही जी. एन. एम. प्रवेश घ्या,' नाहीतर पुढच्या सत्रात परीक्षा द्या' अन्यथा टी. सी. घेऊन घरी जाऊ शकता अशी टाळा टाळी चे उत्तरे दिली. स्वार्थी संचालक स्व - आर्थिक लाभापोटी कॉलेज प्रशासन आम्हा गरीब मुलींचे शैक्षणिक व आर्थिक नुकसानच नव्हे तर मानसिक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी अन्याय ग्रस्त विद्यार्थीनिंनी व उपस्थित त्यांच्या पालकांनी यावेळी केला .  तर धक्कादायक म्हणजे या कॉलेज मधील एक पुरूष कर्मचारी विद्यार्थीनींनीशी लज्जास्पद व नको ते अभद्र बोलून विद्यार्थिनींचा मानसिक छळ करीत असल्याचाही आरोप काही विद्यार्थीनींनी केला. अश्या मानसिक छळ व अभद्र वागणुकीमुळे याच कॉलेज ची एक विद्यार्थीनी काही दिवसांपूर्वी कॉलेज सोडून घरी गेली असून ती सध्या मानसिक तणावात असल्याचे ही काही विद्यार्थीनींनी नाव न लिहण्याच्या व न संगण्याच्या अटीवर पत्रकार परिषदेत सांगितले असून या प्रकाराची तक्रारही करणार असल्याचे ही सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post