अब ब कैफे च्या नवाखाली हुक्का पार्लरवर....

अब ब कैफे च्या नवाखाली हुक्का पार्लरवर तिघांवर गुन्हा दाखल........




बात्मी संकलन धीरज ठाकरे


 कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड घालून तेथून चार हजार ३८० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. रामनगर पोलिसांनी शहरातील रेलटोली परिसरात शनिवारी (दि. १२) रात्री ११:४० वाजेदरम्यान ही कारवाई केली. 'हॅशटॅग कॅफे' असे त्या कॅफे व हुक्का पार्लरचे नाव आहे.

कॅफेच्या नावाखाली रेलटोली परिसरात हॅशटॅग कॅफेमध्ये अवैधरीत्या हुक्का पार्लर चालविण्यात येत असून, तरुण नशेच्या आहारी जात आहेत. याबाबत माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे यांनी शनिवारी (दि. १२) रात्री ११:४० वाजतादरम्यान त्या पार्लरवर धाड टाकली. आरोपी रिचर्ड प्रदीप फ्रान्सिस (२८, रा. बिरजू चौक, रामनगर) हा विनापरवाना अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थांचा हुक्का पार्लर चालवित होता, तर आरोपी आदर्श अनिल विश्वकर्मा (२२, रा. सुबोध चौक, गणेशनगर) व फिलिप बब्बू संतियागो (२१, रा. पाटणकर चौक, जरीपटका, नागपूर) हे आलेल्या ग्राहकांना सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने देत होते.

दरम्यान, पोलिसांनी कॅफेमधून चार हजार ३८० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला, तर रिचर्ड फ्रान्सिस, आदर्श विश्वकर्मा व फिलिप संतियागो या तिघांविरुद्ध रामगनर पोलिस ठाण्यात जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य आणि वितरण नियमन कायदा २००३ चे कलम ४ व या कायद्याचे संदर्भात महाराष्ट्र शासन २०१८चे अधिनियम क्रमांक ६० अन्वये कलम ४ (अ), २१ (अ) चे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post