वृक्षारोपण करणे ही काळाची गरज वनरक्षक व ग्राम वन समिती सचिव अनिल पवार यांचे प्रतिपादन

 

 महादेव पहाडी येथील जंगल परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम


सुमित ठाकरे (आमगांव)

:- ढासळत चाललेल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज झाली आहे. यामुळे प्रत्येकाने तरी एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे अशात एक बाळ एक झाड ही संकल्पना सर्वांनी जोपासावी असे प्रतिपादन आमगाव वन विभागाचे वनरक्षक व ग्रामवन समिती कुंभारटोलीचे सचिव अनिल एम पवार यांनी केले आमगाव तालुक्यातील ग्राम वन समिती कुंभारटोली येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 



कार्यक्रमाचे उद्घाटन आमगाव व कुंभारटोलीच्या पोलीस पाटील नर्मदा चुटे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला वनरक्षक भिन्नता भगत, सोमेश्वरी उके, धनवंती सिहोरे, ग्रामवन समितीचे अध्यक्ष इनोर खोब्रागडे, सहसचिव प्रकाश बोंबर्डे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी वृक्ष संवर्धन बाबत मार्गदर्शन केले व नंतर महादेव पहाडी जंगल परिसरातील तळ्याच्या किनाऱ्यावर झाडे लावण्यात आले हा कार्यक्रम वनपरिक्षेत्राधिकारी रवी भगत व सहाय्यक वनक्षेत्राधिकारी आर. ओ. दसरिया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी ग्रामवन समितीचे विजय डोंगरे, रंजीत गेडाम, संतोष वालदे, मुकेश डोंगरे, कैलास फतेह, भरत उईके, रविता डोंगरे, ममता मेश्राम, सुस्मिता येटरे तसेच ग्राम वन समिती चे पदाधिकारी व सदस्य आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post