बिलाच्या वसुलीसाठी दुकानदाराचे उपोषण
सुमित ठाकरे आमगांव
शहरातील धीरज ठाकरे यांची झेरॉक्सची दुकान आहे. तहसील कार्यालयाकडून पीडित दुकानदाराकडून उसनवारीने झेरॉक्स, स्टेशनरी घेण्यात आली. मात्र, दुकानदाराचे बिल काढण्यास टाळाटाळ केले जात असून या प्रकाराला संतापून दुकानदार ठाकरे यांनी बिलाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयासमोर मंगळवार, 15 ऑगस्ट रोजीपासून उपोषणावर बसले आहे.तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे ऑनलाइन 7/12, निवडणूक याद्या व स्टेशनरीचे प्रलंबित बिल 2014-15 व 2017-18 ची प्रलंबित 1 लाख 3,938 रुपये आणि 2021-22 या कालावधीत जिप व पंस सार्वत्रिक निवडणुकीत याद्या व सातबाराचे 40,448 रुपये असे एकूण 1,44,396 रुपये तहसील कार्यालयावर थकीत आहे. वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटूनसुद्धा आजपर्यंत एकही बिल मिळालेली नाही असा आरोप धीरज ठाकरे यांनी केल आहे. तेव्हा याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे थकीत बिलाची रक्कम त्वरित द्यावी अश मागणी ठाकरे यांनी केली आहे.
शासन सामान्य व्यापाऱ्यांसोबत असे व्यवहार करत येत असेल तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी. निवडणुका संपून 4 ते 5 वर्षे होऊनही एवढी थकबाकी सामान्य व्यापारी कसे पेलवणार. उलट निवडणूक लढविण्याचा उमेदवाराशी हिशोब 30 दिवसांच्या आत घेण्यात येते. तर सामान्य माणसाचे बिल का देण्यात येत नाही. - तीरथ येटरे, माजी उपसरपंच, रिसामा
आमगाव तहसील कार्यालय प्रशासनाने या विषयावर तोडगा काढून थकबाकी द्यावी. कर्जाची परतफेड करा म्हणून बँकेतून दबाव धीरज ठाकरेवर येत आहे. बँकेशी संवाद साधून प्रशासनाने तोडगा काढावा, अन्यथा मनसे आपल्या स्टाइलने यावर तोडगा काढेल व तीव्र आंदोलनही उभारण्यात येईल - *बाळू वंजारी, शहर अध्यक्ष, मनसे*