ध्वजारोहण न करताच ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लोळले

 ध्वजारोहण न करताच ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लोळले


दारूच्या नशेत जमिनीवर लोळले ग्रामसेवक


स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आलेले ग्रामसेवक ध्वजारोहण न करताच ग्रामपंचायत कार्यलयात दारूच्या नशेत जमिनीवर लोळत होते. हा प्रकार आरमोरी तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीत घडला आहे. गावातील युवकांनी त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.आरमोरी पंचायत समितीतर्गत येणाऱ्या कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची तयारी झाली. ग्रामपंचायतीमध्येच मुख्य ध्वजारोहण होत असल्याने गावातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय विद्यार्थी ध्वजारोहणासाठी एकत्र होऊ लागले. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. तेवढ्यात येथील ग्रामसेवक यू. एम. प्रधान आपल्या स्वगावावरून दुचाकीने ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले. दुचाकीवरून उतरून ग्रामपंचायत कार्यालयातील आपल्या कक्षात गेले. हळूहळू ध्वजारोहणाची वेळ होऊ लागली तरी ग्रामसेवक आपल्या कक्षातून बाहेर येईना म्हणून नागरिकांनी जाऊन पाहतात तर काय ग्रामसेवक दारुच्या नशेत जमिनीवर लोळले होते. उपस्थितांनी मोबाइलवरून फोटो काढले. सोशल मीडियावर त्या व्हायरल झाल्या. एक व्हिडीओ आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे पाठवून झालेल्या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीद्वारे बीडीओला देण्यात आली. बीडीओ मोहरकर यांनी या प्रकाराबद्दल ग्रामसेवक प्रधान यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.कोरेगाव ग्रा. पं. मध्ये ग्रामसेवक प्रधान यांची नियुक्ती झाल्यापासून से नियमित हजर राहत नाही.आर्थिक व्यवहारातही मोठा गैरव्यवहार आहे. असे असताना देखील गावकऱ्यांनी त्यांना सांभाळून घेतले; पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दारूच्या नशेत राहून केलेली कृती अशोभनीय आहे. ग्रामसेवक प्रधान यांना तात्काळ निलंबित करावे. या मागणीसाठी पोलिस पाटील ओमप्रकाश मडावी, खुशाल बावणे, विश्वेशराव उसेंडी, दुर्गेश टेंभुर्णे हे जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post