पाटबंधारे विभागाचा कालवा फुटला





जबाबदार पाटबंधारे विभाग की रस्ता बांधकाम विभाग




 गोंदिया जिल्ह्यातील आमगाव- गोंदिया मार्गावरील बाघ पाटबंधारे विभागाचा कालवा फुटल्याने परिसरातील कॉलोनीत व शिवनाथ पेट्रोल पंप येथे पाणी शिरल्याने धावपळ उडाली होती. काही नागरिकांच्या घरात देखील पाणी गेल्याने त्यांचे देखील नुकसान झाले आहे.पुजारीटोला धरणातून या कालव्यामध्ये सध्या ५० क्युसेकने वेगाने शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सुरु होता.; मात्र, आज हा कालवा अचानक फुटल्याने मोठ्या वेगाने


 विभागीय अधिकारी मनीषा कठाने यांचि प्रतिक्रिया 

 कालव्यातील पाणी परीसारातील कॉलोनीत आणि शिवनाथ पेट्रोल पंप तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात शिरले. कालवा फुटल्याने काही वेळ पर्यंत आमगाव गोंदिया मार्गावर वाहतूक ठप्प पडली होती. या कालव्याला पडलेले भगदाड मधून सातत्याने पाणी वाहत असल्याने विसर्ग बंद करण्यात आला आहे. भगदड बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कालवा फुटल्यामुळे रस्त्याना तळ्याचे रूप आले होते. आमगाव गोंदिया मार्गावरील शहरातील रस्ता ओलांडून जाणारा सायफन कालवा असून हा कालवा बरेच वर्षपासून जीर्ण झालेला होता. आमगाव गोंदिया मार्ग रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने या कालव्याला अजूनच भेगा पडल्या होत्या. बाघ पाटबंधारे उपविभाग आमगाव च्या उपविभागीय अधिकारी मनीषा कठाने यांनी सांगितले की, आमगाव गोंदिया मार्गाचे काम सुरू असून रस्ते बांधकाम विभागाला या सायफन पुलाच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र एप्रिल २०२२ ला देण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी रस्ते बांधकाम विभागाची असून आम्ही बांधकाम करिता पाठपुरावा केला परंतु बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे आज ही घटना घडली आहे. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे कालवा बंद करण्यात आला आहे व तात्पुरती दुरुस्ती करून जेव्हा गरज भासेल तेव्हा पुन्हा पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. असे मत पाटबंधारे विभागाचे विभागीय अधिकारी मनीषा कठाने यांनी व्यक्त केले

Post a Comment

Previous Post Next Post