स्वातंत्र्य सेनानी मुकुंदरावजी पुंडकर यांच्या आदर्श बाळगावा- रमा मेंढे सरपंच..
77 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ग्रामपंचायत सुपलीपार व वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने सुपलीपार ग्रामचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी मुकुंदरावजी पुंडकर यांचे चिरंजीव संतोष फुंडकर व सुनबाई जयश्री फुंडकर आणि अग्निवीर मध्ये निवड झालेले पंकज डोये, अंगणवाडी सेविका पुष्पा झा, ग्रामस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार, अंगणवाडी मदतनीस संगीता मेंढे राखी बागडे मोहिनी तरोने, आरती हत्तीमारे, वैशाली हूकरे वर्षा गजभिये, जिंदाकुर, या सर्वांचे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह रमाताई मेंढे सरपंच, सुधीर ब्राह्मणकर उपसरपंच, प्राचार्य व्ही. डी.मेश्राम ,सचिव एन डी अतकरे, मुख्याध्यापक एमआर बारस्कर, पोलीस पाटील राजेश फुंडे आणि राजकुमार मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.क्रीडांगण योजनेअंतर्गत बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण सरपंच रमा मेंढे ,जयश्री पुंडक्रर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमा मेंढे सरपंच यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.मुकुंदरावजी पुंडक्रर आणि आज गावी बावीस वर्षे शिक्षकी पेशा सांभाळून स्वातंत्र्याच्या धगधगत्या आंदोलनात उडी घेऊन प्रसंगी कारागृहात सुद्धा गेले असे या महान व्यक्तिमत्त्वाचे ग्रामस्थांनी सत्कार करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे या गावचे भाग्य समजतो स्वातंत्र्य सेनानी यांचा आदर्श गावकरी आणि विद्यार्थ्यांनी बाळगावा असे आवाहन सुद्धा केले.याप्रसंगी प्रमुख वक्ते प्राचार्य व्ही डी मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन व शैक्षणिक आणि पालक वर्गांना मार्गदर्शन करून पालकांनी शाळेला नेहमी भेट देऊन पाल्याची प्रगतीची माहिती घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी रमा ताई मेंढे, सुधीर ब्राह्मणकर, संतोष पुंडकर, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भाध्यक्ष जयश्री पुंडकर, प्राचार्य व्ही .डी. मेश्राम, पोलीस पाटील राजेश फुंडे, तुलसीराम मेंढे, राजकुमार मेंढे, चुडामन फुं डे व पंचायत चे सर्व सदस्य व शिक्षक वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाला श्यामराव चुटे, श्यामा शिवणकर ,भोजराज भांडारकर चैतराम आग्रे दानेश झा, दीनदयाल रहांगडाले व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते संचालन वर्षा गजभिये यांनी केले. क्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.