गोल्ड सिनेमा हॉलवर दहशतवादी हल्ला




मॉक ड्रील : पोलिस विभागाचा प्रयोग, श्वान पथकाद्वारे संपूर्ण परिसराची तपासणी


बात्मी संकलन - सुमित ठाकरे 


देशांतर्गत आणि राज्यात अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना शहरातील गोविंदपूर परिसरातील गोल्ड सिनेमा हॉलवर दहशतवाद्यांनी गुरुवारी (दि.१०) सायंकाळी ५:३० ते ६ वाजेदरम्यान हल्ला केला. जिल्हा पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मोठ्या शिताफीने हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी गोल्ड सिनेमा येथे सिनेमा पाहण्यास आलेल्या दर्शकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने बॉक्स रूममधील स्टाफला वेठीस धरले. सिनेमा हॉल सुरक्षा यंत्रणेकडून जिल्हा पोलिसांना माहिती देताच जिल्हा पोलिस प्रशासन यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर तिन्ही सशस्त्र दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिनेमा हॉलमधील दर्शक जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात पाठविण्यात आले. श्वान पथकाद्वारे संपूर्ण गोल्ड सिनेमा परिसराची स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबमार्फत घटनास्थळाचे भौतिक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही सशस्त्र दहशतवाद्यांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.या कारवाईत जिल्हा पोलिस दलातील दहशतवादविरोधी पथक, बीडीडीएस पथक, पोलिस मुख्यालयातील पोलिस पथक, पोलिस ठाणे रामनगर, गोंदिया शहर, ग्रामीण येथील पोलिस पथक, अंगुलीमुद्रा विभाग, वैद्यकीय स्टाफ, अग्निशमन दल व जलद कृती दल (क्यूआर. टी), दंगल नियंत्रण आरसीपी पथक,बिनतारी संदेश विभाग, मोटर परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा सुरक्षा शाखा, जिल्हा विशेष शाखा, नक्षल सेलमधील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदविला. गोल्ड सिनेमाचे मालक अग्रवाल यांनी दहशतवादी हल्ला मॉक ड्रील राबविण्याकरिता विशेष साहाय्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post