🌾🌾आमगांव तालुक्यात रानभाजी महोत्सव साजरा🌾🌾
बात्मी संकलन जीतू पटले
आमगांव - कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, तालुका कृषि अधिकारी कार्यालय आमगांव वतीने जागतिक आदिवासी क्रांतीदिनानिमित्त तालुक्यात कृषि उत्पन्न बाजार समिती आमगांव येथे दिनांक ११ ऑगष्ट २०२३ रोज शुक्रवारला रानभाजी व मिलेट महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन देवरी/ आमगावं विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री. सहसरामजी कोरोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. केशवराव मानकर, सभापती कृ.उ.बा.स. आमगांव, मा. श्री. राजेंद्रजी गौतम सभापती पंचायत समिती आमगांव, प्रमुख उपस्थिती मा. श्रीमती उषाताई मेंढे, जि. प. सदस्य, मा. श्रीमती छायाताई नागपुरे जि.प.सदस्य, मा. श्रीमती. छबूताई महेश उके जि.प. सदस्य, श्री. नंदकिशोर कोरे पं.स. सदस्य, सौ. सुनंदा तेजराम उके प.स. सदस्य, सौ. योगिता यशवंतराव मुंडे प.स.सदस्य, श्री. संजय बाहेकर, सा.का. आमगांव, मा. श्री. गिरधारी बघेले, सभापती कृ.उ.बा.स. गोरेगांव, मा, अर्चना मुकुंद अयाचित, गट विकास अधिकारी, पंचायत समिती आमगांव, श्री महेंद्र दिहारे तालुका कृषि अधिकारी, आमगांव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आमदार श्री. कोरोटे साहेब यांनी आपल्या भाषणात विविध रानभाज्यांचे महत्व समजावुन सांगितले. परसिरात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आरोग्यास खुप लाभदायक असुन औषधी गुणधर्मांनी भरलेले आहेत तसेच आजच्या धकाधकीच्या जिवनात रासायनिक भाजीपाल्यांचा वापर वाढत चालला आहे त्यात सामान्य जनतेने रानभाज्यांचा वापर आपल्या रोजच्या आहारात घेणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. केशवरावजी मानकर यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी तसेच आपल्या जिवनात रानभाज्यांचा समावेश करावा असे सांगितले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी रानभाजी व पोष्टिक तृनधान्याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात ४० स्टॉल असुन परिसरात आढळणाच्या ४० ते ४५ प्रकारच्या विवीध रानभाज्या प्रदर्शनी व विक्री करिता तालुक्यातील महिला गट व शेतकरी गटांद्वारे ठेवण्यात आल्या होतो. सोबतच रानभाज्यांपासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्री करिता ठेवले होते. मान्यवरांनी महोत्सवातील सर्व स्टॉलला भेट दिली व रानभाज्यांची माहिती घेतली तसचे तयार खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे नियोजन आत्मा व तालुका कृषि अधिकारी कार्यालय आमगांव मार्फत करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री. ब्राम्हणकर, कृप यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्तावविक श्री. दिहारे ता.कृ.अ. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीः शैलेश बिसेन यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. राहुल सेंगर व श्री. शैलेश बिसेन स.त.व्य. आत्मा यांनी केले तर कृषि विभागातील सर्व कर्मचारी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता उमेद व माविम चे महिला गट यांनी मोलाचे कार्य केले. कार्यक्रमात सहभाग घेण्याऱ्या सर्व गट व शेतकऱ्यांना प्रसस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आले. महोत्सवात ग्रामिण व शहरी भागातील लोकांनी भेट दिली व रानभाज्यांची मोठया प्रमाणात खरेदी केली.