अनोळखी व्यक्तीने दुसऱ्यास फोन लावण्याच्या बहाण्याने मोबाइल फोन अन घडल अस काही....
कोहमारा अनोळखी व्यक्तीला मोबाइल फोन देणे ग्राम चिखली येथील तरुणाला चांगलेच महागात पडले. अनोळखी व्यक्तीने त्याच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख २४ हजार रुपये उडविले.ग्राम चिखली येथील तरुण नानू भेंडारकर हा नियमित कामासाठी सडक-अर्जुनी येथे गेला होता. बँकेचे काम आटोपून सडक-अर्जुनी येथील शेंडा चौकात उभा असता एका अनोळखी व्यक्तीने दुसऱ्यास फोन लावण्याच्या बहाण्याने मोबाइल फोन मागितला व फोन लावता लावताच त्याच्या बँक खात्यातून १ लाख २४ हजार रुपये क्रमाक्रमाने खात्यातून उडविले व मोबाइल परत करून पसार झाला.नानूने मोबाइलकडे लक्ष न देता तसाच खिशात घातला. घरी - आल्यानंतर सहज मोबाइल तपासला असता बँक खात्यातून पैसे विड्रॉल झाल्याचे मॅसेज दिसले. पूर्ण मॅसेज चेक केला असता तीन-चार वेळा अनुक्रमे एकूण एक लाख २४ हजार रुपये कॅश ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. आपण कसलेही पैसे विड्रॉल न करता मॅसेज आल्याने अनोळखी व्यक्तीस मोबाइल दिल्याने फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर त्वरित संबंधित बँकेला कळविले. या प्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशन डुग्गीपारला करण्यात आली आहे.अनोळखी व्यक्तीने दुसऱ्यास फोन लावण्याच्या बहाण्याने मोबाइल फोन अन घडल अस काही....
bySumit Thakre
-
0