आदर्श विद्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा...!

 आदर्श विद्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा...!




सुमित ठाकरे (आमगाव )

स्थानिक आदर्श विद्यालय आमगाव येथे शासनाच्या परिपत्रकानुसार जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी शहराच्या मुख्य रस्त्यावरून जागतिक आदिवासी दिवस व भगवान बिरसा मुंडा यांच्या घोषणासह फिरविण्यात आली.या प्रसंगी आदर्श विद्यालयच्या प्रांगणात संपन्न झालेल्या जागतिक


 आदिवासी दिवस समारोहाचे अध्यक्ष आदिवासी नेते व समाजिक कार्यकर्ता श्री शंकर लाल मडावी तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमगाव चे समाजसेवी दंत चिकित्सक डॉ श्रीकांत राणा हे होते. विशेष म्हणजे दोन्ही अतिथी हे आदर्श विदयालयाचे माजी विद्यार्थी आहेत. प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री तिरगाम सर होते. भगवान बिरसा मुंडा, शारदा देवी व श्रद्धेय मानकर गुरुजी यांच्या प्रतिमेसमोर् दीप प्रज्वलन करुन या समारोहाचे विधिवत उदघाट्न झाले.या प्रसंगी मंचावर आदर्श विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री के एस डोये, पर्यवेक्षक श्री डी बी मेश्राम , पर्यवेक्षक श्री यु एस मेंढे, ज्येष्ठ शिक्षक श्री एस एल मानकर व श्री आर जे पटले होते.या समारोहात अनेक विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपले विचार मांडले व गीत सादर केले. या समारोहाचे अध्यक्ष श्री शंकर भाऊ मडावी यांनी आदिवासी दिनाचे महत्व सांगून भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ राणा यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना केल्या. सर्वात शेवटी केंद्र शासनाच्या मेरी माटी मेरा देश या संकल्पनेतून सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली.या जागतिक आदिवासी दिन समारोहाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक श्री यु एस मेंढे व सूत्र संचालन श्री तुरेकर सर तसेच आभार प्रदर्शन कु एस टी पटले यांनी केले. समारोहाला यशस्वी करण्यासाठी श्रीमती ए आर गुप्ता, श्री काळोदे सर, क्रीडा शिक्षक पटले सर सौ एस एल मानकर व अन्य सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post