आमगांव तालुक्यात आढळले दोन दुर्मीळ गिधाड पक्षी
बात्मी संकालन बालू वंजारी (आमगाव)
दोन गिधाड अत्यवस्थावस्थेत तालुक्यातील पिपरटोला गावाजवळ बुधवारी (दि.९) आढळले. दरम्यान, गावकऱ्यांनी याची माहिती आमगाव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.दोन्ही गिधाडांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आमगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक दिवस उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील वन विभाग उपचार केंद्र सेमिनरी हिल्स येथे पाठविण्यात आले आहे.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गिधाडांना अन्न न मिळाल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली व ते आजारी पडल्याचे सांगितले. सध्या त्यांच्यावर नागपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.गिधाडांना नैसर्गिक खाद्य मिळत नसल्याने गिधाडांची संख्या कमी होत आहे. वन विभागाचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासक यांचे म्हणणे आहे. सध्या हे दुर्मीळ गिधाड गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या ठिकाणी कुठून आले याचा शोध आमगाव वन विभाग घेत आहे.