महाराष्ट्रातील पोलिसांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार- राहुल दुबाले
महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी राज्यातील पोलीस विभागात कार्यरत व सेवानिवृत्त पोलीस बांधवांसाठी व कुटुंबाच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी एक हक्काचे संघटन निर्माण केले. पोलीस बांधव भगिनी व अधिकारी यांच्यावर होणाऱ्या समस्यांना वाचा फोडली. व सतत पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी संघर्षशील राहून आपल्या पोलीस कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्याच्या आटोकाट प्रयत्न करीत आहे.
त्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी व उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी आपल्या पोलीस बांधवांना बसता यावे यासाठी एक हक्काची लढाई लढून आपल्या पोलीस बांधव भगिनींना पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न हे राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सतत पाठपुरावा करीत राहिले व त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला राज्याचे गृहमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले.
त्यांच्या या कार्याला संघटनेच्या व पोलीस कर्मचारी बांधवाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भाध्यक्ष जयश्री पुंडकर व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांनी राहुल भैया दुबाले यांचे अभिनंदन करून यापुढेही महाराष्ट्रातील तमाम पोलीस कर्मचाऱ्यांच्या व कुटुंबियाच्या शासन दरबारी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करून महाराष्ट्रातील पोलीस बांधवांना अधिकारी होण्याची दिलेली भेट कौतुकास्पद व अभिनंदन आहे.