जे. एम. पटेल कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची "शिका आणि कमवा" योजनेअंतर्गत निवड..
बात्मी संकलन सुमीत ठाकरे
जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा आणि क्विक हील फाउंडेशन पुणे यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. क्विक हील फाउंडेशन हि भारतातील अँटी व्हायरस बनविणारी क्विक हील टेकनॉलॉजि या अग्रगण्य कंपनीची उपसंस्था असुन महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या सोबत सायबर सुरक्षेवर कार्य करीत असते. या कराराअंतर्गत संगणकशास्त्र विभागातील २२ विद्यार्थ्यांची "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या उपक्रमांतर्गत "सायबर योद्धा" म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे विद्यार्थी शाळा, महाविद्यालय, नातेवाईक तसेच समाजात सायबर सुरक्षेसाठी जागरूकता हे अभियान राबवणार आहेत. हि निवड प्रक्रिया शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर, २०२३ रोजी राबविण्यात आली. याप्रसंगी क्विक हील फाउंडेशन चे विदर्भ समन्वयक श्री नागेश तलारी यांनी संपूर्ण प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निवड झालेले सायबर योद्धे परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणार आहे व त्या मोबदल्यात क्विक हील फाउंडेशन प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार आहे.
या निवड चाचणी साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विकास ढोमणे, IQAC समन्वयक, डॉ. कार्तिक पणिकर तसेच क्विक हील फाउंडेशनच्या सौ. सुगंधा दाणी आणि सौ. गायत्री पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्व विद्यार्थ्यांना संगणक विभाग प्रमुख डॉ. प्रविण घोसेकर तसेच संगणकशास्त्र विभागातील डॉ.सबाह नसीम, सौ.प्रियांका शर्मा, श्री.पलाश फेड्डेवार यांचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विकास ढोमणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.