शाळेचे रेकार्ड आढळले भंगार विक्रेत्याच्या दुकानात... धामणगाव येथील प्रकार....

 👉👉शाळेचे रेकार्ड आढळले भंगार विक्रेत्याच्या दुकानात... 


👉👉 आमगांव तालुकातील धामणगाव येथील प्रकार....



गोंदिया / सुमित ठाकरे

शाळेचे दस्तावेज, विद्यार्थ्यांचे टीसी, मार्कलिस्टसह दाखल्यांच्या नोंदी असलेला रेकार्ड चक्क भंगार विक्रेत्याच्या दुकानात सापडल्याची घटना गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील धामणगाव येथे उघडकीस आली. दरम्यान या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन समितीचा गलथान कारभार पुढे आला असून गावकऱ्यांनी या प्रकाराला घेवून संताप व्यक्त केला आहे. आमगाव पंचायत समिती अंतर्गत धामणगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेचा रेकार्ड मागील २० वर्षांपासून गहाळ झाला होता. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पाल्यांचे दाखले व शैक्षणिक कागदपत्रे मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागत होती. यात १९६० पासूनचे शैक्षणिक रेकार्डचा समावेश होता. मंगळवारी धामणगाव येथील भंगार विक्रेत्याकडे ०५ पोत्यांमध्ये खरेदी केलेली रद्दी पडली होती. दरम्यान या विक्रेत्याच्या दुकानात गावातील एक तरुण बसला होता. त्याने पोत्यातील रद्दी पाहली असता त्यात शाळेचे दाखल खारीज रजिस्टर व इतर दस्तावेज आढळले. त्यांने अजून काही कागदपत्रे पाहिली असता त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे दाखल खारीज प्रमाणपत्र आढळले. दरम्यान हे पाहून त्याला सुध्दा धक्का बसला.



Post a Comment

Previous Post Next Post