अखिल भारतीय माळी महासंघ ची विदर्भ विभागीय बैठक संपन्न.
सुमित ठाकरे /नागपुर
आज दिनांक 10 /9/2023 रविवार रोजी नागपूर येथील आमदार निवास सभागृह मध्ये पार पडली यामध्ये विदर्भातील महत्त्वाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते या सभेमध्ये प्रामुख्याने ओबीसी आरक्षण बचाव या विषयावर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला दिशा देण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला असून अखिल भारतीय माळी महासंघ आता संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींचा आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावरची लढाई व कायदेशीर लढाई लढण्यासाठी तत्पर झालेली आहे. ओबीसी च्या पाठीत खंजीर खूपसनार असेल तर त्यांना इंगा दाखविण्याची तयारी अखिल भारतीय माळी महासंघाने केलेली आहे. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी जागे रहावे असे आहवाहन प्रदेश अध्यक्ष ॲड.राजेंद्र जी महाडोळे यांनी केले. या सभेला विश्वस्त सुभाषजी सातव ,विश्वस्त श्रीकृष्णजी बनसोड, शंकरराव राऊत, विजय शहारे, अरुण भेदे राम भेंडारे ,विठ्ठलराव नागतोडे ,अमोल दादा गुरनुले,उत्तमराव खंदारे, गजानन सोनुले ,अंकुश निकोडे ,वासुदेवराव गुरनुले, सौ. वर्षाताई लोणबले ,ईश्वर चौधरी, नलेश्र्वर आदे, रमेश गणोरकर, ,गणेश काळपांडे श्रीकृष्ण बीरकड ,डॉ.नितीन देऊळकर, गणेश चहारे, गजानन सोनुले, अंकुश निकोडे, राहुल डोंगरवार,