घराशेजारील युवकाकडून विवाहितेचा विनयभंग
•मोगरा/शिवनी येथिल घटना
•युवकावर गुन्हा दाखल
लाखनी:-पिडीता ही आपले घराचे मागील भागात चूल पेटवित असताना घराशेजारी राहणाऱ्या युवकाने मागेहून येऊन दोन्ही हात धरून विनयभंग केल्याची घटना मोगरा/शिवणी येथे शनिवारी (ता.१६) सकाळी ६:०० वाजता दरम्यान घडली.पीडितेच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवकाचे नाव मच्छिंद्र माधव मेश्राम (२५) रा. मोगरा/शिवणी, तालुका लाखनी असे आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.पिडीत विवाहिता व आरोपी युवक एकमेकाच्या शेजारी वास्तव्यास असून पीडितेच्या पती बरोबर हमलीचे काम करीत होते. पिडीतेच्या पतीला पायाला इन्फेक्शन झाल्याने पायावर शस्त्रक्रिया झाली आहे.घटनेच्या दिवशी विवाहिता सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास घराचे मागे पांझीत चुलीकडे तोंड करून चुलीजवळ बसलेली असताना आरोपी युवक मच्छिंद्र मेश्राम हा मागेहून आला व त्याने माझे दोन्ही हात पकडुन त्याच्याकडे ओढले.मी हात झटकून जोराने ओरडले व घरात गेले. आरोपी युवकाने विवाहित महिलेच्या लज्जेस धक्का वाटेल असे कृत्य करून फिर्यादी चा विनयभंग करून पळून गेला.या आधीही २ दिवसापूर्वी त्याने असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. घडलेली बाब पिडितेने मामे सासऱ्यास सांगितली व त्याचेसोबत लाखनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३३६/२०२३ कलम ३५४ (अ) भादवि नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात महिला पोलिस हवालदार वासंती बोरकर तपास करीत आहेत.