कामठा ते सालेकसा मार्ग रस्त्यासाठी माजी आ.पुराम यांना निवेदन
आमगाव : येथील कामठा ते सालेकसा मार्गे रस्त्याची दैनिय अवस्था असून पक्का रस्ता तयार करण्यासाठी माजी आमदार संजय पुराम यांना कामठा - सालेकसा मार्ग संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.त्या वेळी तात्काळ संजय पुराम यांनी मुख्यमंत्री, आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना मेल दौरे कामठा ते सालेकसा येथील रस्त्याची समस्या अवगत केली.सदर महामार्ग बिरसी हवाई मार्ग, बालाघाट, डोंगरगड, रायपूर या प्रमुख मार्गात समावेश आहे. या ठिकाणाहून मध्यप्रदेश, छत्तीसगड,येथील प्रवासी अधिक प्रमाणात आवागमन करतात तसेच जिल्याला जोडणारा अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या सालेकसा, दरेकसा येथील विध्यार्थी, शेतकरी, व्यापारी, मजूर आणि कर्मचाऱ्यांना दररोज प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या वेळीनिवेदन देतांनी संघर्ष समितीचे संयोजक राजीव फुंडे, राजेश शिवणकर, राम चक्रवर्ती, प्रशांत कोरे, धनलाल मेंढे, बालाराम व्यास,पिंटू अग्रवाल,सुनील पडोळे,रामा मुनेश्वर, योगेश येटरे, मनोज सोमवंशी,लक्ष्मण चुटे,कृष्णा चुटे, करंडे,राजेंद्र गौतम,वट्टी,गणेश हरिनखेडे आदी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.