शहरातील समस्यांसह जमिनीचे पट्टे द्या पिंकेश शेंडे यांची निवेदना मार्फत मांगनी..
आमगाव नगर परिषद अंतर्गत विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या मागणीला घेवून कांग्रेस कमिटी आमगांव च्या वतीने आमदार सहसराम कोरोटे यांना निवेदन सादर करण्यात आले.आमगाव नगर परिषदेची घोषणा झाली मात्र अद्यापही निवडणुका झालेल्या नाहीत त्यातच नगर परिषद क्षेत्रात ,शौचालय, घरकुल यो योजनांचा लाभ अनेक गरजू लाभाथ्यांना मिळालेला नाही. तसेच पालिकेतील कर्मचारी कर वसुलीच्या नावावर दिशाभूल करीत आहेत. पालिका क्षेत्रात वर्षानुवर्षांपासून राहणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनीचे पट्टे मिळालेले नाही यामुळे त्या लाभार्थ्यांना कर्ज मिळत नाही. अशा विविध मांगन्या घेउन दी ०६/०९/२०२३ ला पिंकेश शेंडे उपाधक्ष अनु. जाति कांग्रेस कमिटी आमगांव यानि दिले या यावेळी संजय बहेकार तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी आमगांव,.अजय खेतान शहर प्रमुख काँग्रेस कमिटी आमगाव, मा.भूमेश्वरजी मेंढे , रामेश्वर श्यामकुवर , महेश उके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव, अजय गहरवार , हंसराज जोशी ., प्रशांत रावते ,परमेश कांबळे युवक , कुणाल शेंडे व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.