आमगाव नगर परिक्षेत्रातील आठ गावातील समस्यांबाबद प्रशासन गंभीर नाही!
# नियोजित सभेला अधिकाऱ्यांची दांडी
# दिरंगाईकरांना शोकास
# नागरिक तीव्र आंदोलन करणार
आमगाव:- नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा व समस्यांबाबद ५ सप्टेंबर ला तहसील कार्यालयात सभा आयोजित करण्यात आले होते. सदर सभेला विविध विभागातील अधिकाऱ्यांनी चक्क दांडी मारली त्यामुळे नगर परिषद संघर्ष समितीने व उपस्थित नागरिकांनी अधिकारी विना सभेला मज्जाव करीत दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना शोकास ची मागणी करीत सभा तहकूब केली.
आमगाव नगर परिषदचा न्यायालयीन प्रकरण राज्य सरकारने योग्य पद्धतीने हाताळले नसल्याने प्रकरण आठ वर्षे लोटूनही मार्ग निघाले नाही.त्यामुळे आठ गावातील समस्यां 'जैसे थे वैसे, पडून आहेत.तर नागरिकाना मूलभूत सुविधा मिळत नाही.यात नगर परिषद संघर्ष समितीने राज्य सरकार ला लेखी निवेदने देऊनही निर्णय करण्यात आले नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही प्रत्यक्ष भेटून अनेकदा निवेदने दिली परंतु उदासीनता मुळे न्यायालयीन प्रकरण निकाली काढण्यात सरकारला यश आले नाही.यात मात्र नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित व्हावे लागत आहे.
नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील समस्याचे निराकरण व नागरिक सुविधा मिळावी याकरिता नगर परिषद संघर्ष समितीने पुढाकार घेत स्थानिक प्रशासनाने संबधित अधिकाऱ्यांची सभा घेण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती .नियोजित सभा तहसील कार्यालयात ५ सप्टेंबर ला घेण्यासाठी संबंधित विभागांना पत्र पाठविण्यात आले परंतु अनेक विभागातील अधिकारी यांनी सभेला चक्क दांडी मारली यामुळे संघर्ष समिती व उपस्थित नागरिकांनी चांगलेच धारेवर घेतले.नागरिकांनी जोपर्यंत सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होणार नाही तोपर्यंत सभा टाळण्यात यावी अशी मागणी केली व प्रशासन नागरिकांच्या समस्या व मूलभूत सुविधा उपलब्ध करणार नाही त्याविरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाणार असे मत पुढे करण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार सतीश वेलादी यांनी उपस्थित नागरिकांचे प्रश्न लेखी दखल घेतली.व पुढील सभेत संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असे आस्वासित केले.यावेळी नगर परिषद संघर्ष समितीचे यशवंत मानकर,उत्तम नंदेश्वर,प्रा.कमलबापू बहेकार ,संभुद्याल अग्रीका ,प्रमोद कटकवार, कृष्णा चुटे, वसंत मेश्राम,राजेश शिवनकर,निक्की गुप्ता,आनंद शर्मा,गजानन भांडारकर, चंद्रप्रकाश जांगळे,मोरेश्वर पटले, मुन्ना बिसेन, राम चक्रवर्ती,धनलाल मेंढे,राधाकिसन चुटे,बालाराम व्यास आदी नागरिक उपस्थित होते.