धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे
मुनेश पंचेश्वर (आमगांव)
आज दि. २७/१०/२०२३ ला आमगांव तालुका कांग्रेस कमेटी व किसान काँग्रेस कमिटी आमगाव द्वारे आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफ करण्यात यावे व शेतकऱ्यांचे विद्युत बिल खंडित करू नये आणि ३००० रुपये धानाचे हमीभाव देण्यात यावे किंवा शेतकऱ्यांना एक हजार रुपये बोनस देण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र शासन मुंबई, मार्फत - तहसीलदार साहेब तहसील कार्यालय आमगाव यांना देण्यात आले. यावेळी संजय बहेकार तालुका अध्यक्ष कांग्रेस कमेटी आमगांव, दिलीपजी टेंभरे गोंदिया किसान काँग्रेस उपाध्यक्ष, अजय खेतान शहर प्रमुख काँग्रेस कमिटी आमगाव, .गणेश हूकरे किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष आमगाव, राजेशजी देशमुख उपाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी आमगाव, श्याम देशमुख उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, मा.रामेश्वर श्यामकुवर अनु.जाती अध्यक्ष ता.काँग्रेस कमिटी आमगाव, तारेन्द्र रामटेके पं.स. सदस्य आमगाव, .भुमेश्वरजी मेंढे वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता, .राधेलालजी रहांगडाले सेवा दल तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगाव, उज्वल बैस युवक काँग्रेस गोंदिया जिल्हा महासचिव, जगदीश चुटे महासचिव ओबीसी विभाग जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया, अजयजी हटवार आमगाव, फद्दूजी राऊत काँग्रेस कार्यकर्ता सुपलीपार, निशांत मडामे काँगेस जनसंपर्क कार्यालय आमगाव व तसेच अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.