शहीद वीर जवानांना पो. स्टे .आमगांव व महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली
मुनेश पंचेश्वर (आमगाव.)
26 /11 रोजी झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या वीर जवानांना पोलीस स्टेशन आमगाव व महाराष्ट्र पोलीस बाय संघटना गोंदिया जिल्हा च्या वतीने मुंबई आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी पोलीस निरीक्षक युवराज हांडे साहेब महाराष्ट्र पोलीस बाय संघटनेचे विदर्भाध्यक्ष जयश्री फुंडकर, PSI अक्षय वळसे पाटील, ASI हिरालाल रहांगडाले, संघटनेच्या वंदना बैस, रिंकी गुप्ता, रेखा टेंभरे व पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधव भगिनी आणि संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी दोन मिनिटाचे मौन धारण करून शहीद वीर जवानांना आदरांजली वाहली. याप्रसंगी पोलीस स्टेशन आमगाव व एचडीएफसी बँक च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहीद दिनानिमित्त लोकमान्य रक्तपेढी गोंदिया यांनी रक्त गोळा करण्याचे कार्य केले.पोलिस हवालदार सुरेंद्र लांजेवार, भाऊराव कटाने, राकेश परिहार, महेंद्र डोये, ASI अनिस राठोड, राजेंद्र बिसेन, माधुरी गणवीर, सत्यशीला छिपे यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरात डॉ. पी .एम .नागरिकर, राजू रहांगडा ले, युगल बिसेन, रेवती बिसेन आदींनी रक्तदान शिबिरात सहकार्य करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.रक्तदान शिबिर व पोलीस वीर श हिदांना श्रद्धांजली चे आयोजन करून पोलीस स्टेशन आमगाव व महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेच्या वतीने रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे आभार व्यक्त केले.