आदिवासी समाज समिति पिंपळगाव को च्या पुढाकाराने...
संविधान दिवस व एक दिवसीय क्रांतिसूर्य बिरासा मुंडा जयंती महोत्सव संपन्न....
पिंपळगांव/को
क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी समाज समिति पिंपळगाव (को) समितीतर्फे संविधान दिवस व एक दिवसीय क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती महोत्सव कार्यक्रम दिनांक 26/11/2023 रविवार ला पिंपळगाव (को) येथे आयोजीत करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उद्घाटक मालतीताई कींन्नाके अध्यक्ष आदिवासी महीला ब्रिगेड गोंदिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष उषाकिरण आत्राम से नि अधिकारी, आदिवासीं भाषा, संशोधक, साहित्यिक, लेखिका, कवयत्री सविताताई बेदरकार सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचित वाळवे सर, तसेच सौ अस्मिता लांडगे सरपंच, सौ गिताताई परशुरामकर उपसरपंच, अतुल मसराम गोंडी धर्म प्रचारक, सुनील बारसांगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रमात सकाळी 7 वा आदिवासी संस्कृतीचे दर्शन देत जयसेवा नाल ग्रुप बोरटोला/गोंदिया व पिंपळगाव आदिवासीं समाजा तर्फे भव्य रॅली काढण्यात आली. दुपारी समाजप्रबोधनाचे कार्यक्रमात उपरोक्त प्रमुख अतिथिनी मार्गदर्शन केले, वाळवे सरांनी समाजाची प्रगती कशी होईल त्यासाठी कार्य करण्याची गरज आहे यावर मार्गदर्शन केले. सरपंच लांडगे यानी गावात नवीन नोकरी लागणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील प्रमुखाला सन्मानित करण्याच्या आदिवासीं समाजाच्या प्रथेला गावंस्थरावर राबवू तसेच सट्टा दारू यांना गावबंदी करण्यात आली यावर मार्गदर्शन केले. यावेळी योगेश मडावी व राहुल कोलवते यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.तसेच संध्याकाळी गोंडी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात दहा हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक सरपंच अस्मिता लांडगे यांचे कडून पिरीत के परेवना लोक सांस्कृतिक संस्था डान्स परिवार राजनांदगाव (छ. ग.) यांना देण्यात आले, दुसरे पारितोषिक सात हजार रुपये अतुल नारायण परशुरामकर यांचे कडून बिरसा फायटर डान्स ग्रुप धाबेटेकडी यांना देण्यात आले, तर तिसरे पारितोषिक पाच हजार रुपये प्रवीण रामदास परशुरामकर यांचे कडून आदिवासी डान्स ग्रुप कुरखेडा यांना देण्यात आले.सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आसाराम सलामे, शंकर परतेके, तुषार परतेके, ईश्वर सयाम, भुवनपाल गेडाम, मुन्ना मडावी रामदास उईके, केशव मडावी, माणिक मडकाम, सुधाकर कोराम, कार्तिक कोळवते, गणेश सलामे, तसेच माजी पंचायत समिती सदस्य तिकाराम मडावी, मोरेश्वर कोराम, व सर्व आदिवासीं समाज पिंपळगाव (को) यानी मोलाचे सहकार्य केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिक कोळवते व गणेश सलामे यांनी केले.