ओबीसी विद्यार्थ्यांना पायलट होण्यासाठी कमर्शियल लायसन्सचे प्रशिक्षण द्या तसेच 100% शिष्यवृत्ती द्या - राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाची मागणी. (नागपूर) महाज्योतीमार्फत ओबीसी विजा, भज व विमाप्र
विध्यार्थ्यांना अनेक प्रशिक्षण देण्यात येत आहे ,यामधील पायलट प्रशिक्षण सुद्धा एक महत्त्वाचे प्रशिक्षण सुरू आहे मात्र पायलट प्रशिक्षण सुरू असताना ओबीसी , विजा ,भज व विमाप्र विद्यार्थ्यांना फक्त सिंगल इंजिन वरती प्रशिक्षण देण्यात येत आहे, यामुळे या विद्यार्थ्यांना कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळनार नाही,त्यांना या योजनेचा कुठल्याही पद्धतीचा फायदा होणार नाही ,म्हणून सरकारने यांच्यावरती केलेला खर्च हा निषफळ होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना पंधरा तासाचे डबल इंजिनचे ट्रेनिंग देण्यात यावे ,यामुळे विद्यार्थ्यांना कमर्शियल पायलटच लायसन्स मिळेल आणि या माध्यमातून त्यांना या योजनेचा लाभ होईल आणि हेतू सुध्दा साध्य होईल, तसेच महाराष्ट्र मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत असलेली भारत सरकार शिष्यवृत्ती अनुसूचित जाती धर्तीवर 2002- 2003 पासून ही योजना महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती योजना सुरू केली ही योजना सण 2010 पर्यंत शंभर टक्के
शिष्यवृत्ती मिळत होती, मात्र 2010 नंतर ही शिष्यवृत्ती योजना 50 टक्क्यावर आणण्यात आली केंद्र सरकारचा कुठलाही जीआर नसताना महाराष्ट्रातल्या ओबीसी विद्यार्थ्यांना केवळ 50 टक्के शिष्यवृत्ती दिली जाते परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गळती निर्माण होत आहे ,केंद्र सरकार कडून ओबीसींच्या नावाने येणारी शिष्यवृत्ती मात्र विजा, भज व विमाप्र च्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात येते आणि ओबीसीला 50 टक्के शिष्यवृत्ती देण्यात येत आहे म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण ही शिष्यवृत्ती 100% करून ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष ऋषभ राऊत व नागपूर जिल्हाध्यक्ष निलेश कोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ओबीसी मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले या वेळी ओबीसी नेते मंत्री छगनराव भुजबळ , तसेच मंत्री संजय राठोड उपस्थित होते.