आदर्श कनिष्ठ महाविद्यालय कला विभागाची शैक्षणिक सहल संपन्न।

 आदर्श कनिष्ठ महाविद्यालय कला विभागाची शैक्षणिक सहल संपन्न।



आमगाव

आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील कला विभागाची एक दिवसीय सहल डोंगरगढ़ बमलेश्वरी देवी मंदिर व डोंगरगढ येथील वॉटरपार्क परिसरात दिनांक २७ डिसेंबर रोजी संपन्न झाली. कला विभागातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला.शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे सद्यस्थितीत शिक्षक



 शैक्षणिक सहल आयोजित करण्यात कचरतात.जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने ही सहल आयोजित केली गेली. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामूहिक शिस्तीचे संस्कार, निरीक्षण सवय, आंतरिक गुणांचा विकास व पर्यावरणाशी जवळीक निर्माण होते असे मत कला विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री यू एस मेंढे यांनी व्यक्त केले.शाळेपासून ६५ की मी असलेल्या छतीसगढ राज्यातील या मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी शिस्तीत दर्शन केले व घरून आणलेला जेवणाचा डबा सामूहिक पद्धतीने आपसात वाटून आनंद घेतला.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात भ्रमण करून विविध प्रकारचे खेळ व संगीताच्या तालावर नृत्य सादर केले.जवळच असलेल्या वॉटर पार्क मधे विद्यार्थ्यांनी मनसोक्त नृत्य करून आनंद घेतला. सायंकाळी सर्व विद्यार्थी प्रसन्न मनाने आपापल्या घरी पोहचली.या सहलीला यशस्वी करण्यासाठी श्री प्रवीण कावळे सर , कू आर जी अंबुले, कू. एस टी पटले या शिक्षकांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post