आव्हान शिबिरात नागपुर जिल्हा ठरला रॅलीत आकर्षणचा केंद्र.

 राज्यस्तरीय आव्हान शिबिरात विद्यार्थ्यांनी रॅलीतून घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन.



बात्मी संकलन सुमीत ठाकरे 

दहा दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिक्षण शिबिर आव्हान' गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. सातव्या दिवशी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हानची रैली आरमोरी मार्गावरील सभागृहापासून शहराच्या मुख्य मार्गाने मार्ग भ्रमण करत निघाली. तत्पूर्वी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी महाल पेटवून तसेच रॅलीला हिरवा झंडी दाखवून रवाना केले या रैलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रैलीतून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले शुभारंभाप्रसंगी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तथा शिबिराचे समन्तयक डॉ. श्याम खंडारे, सहसमन्वयक डॉ, प्रिया गेडाम, एनडीआरएफचे निरीक्षक पंकज चौधरी, नागपूर विद्यापीठाचे परीक्षक सतीश चाफले, जळगाव विद्यापीठाचे परीक्षक सचिन नाई, नागपुर विद्यापीठाचे रासेयो संचालक सोपानदेव पिसे, गढ़चिरोली जिल्हारासेयो समन्वयक डॉ. श्रीराम गहाणे,चंद्रपूर जिल्ला समन्वयक विजया गेडाम, विभागीय समन्वयक उषा खंडाळे, डॉ. पवन नाईक, डॉ. गुरुदास बल्की प्रदीप चाफले आदी उपस्थित होते. धार्मिक सलोखा, एकात्मता भारतीय संविधान, वारकरी संप्रदाय विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती पर्यावरण, मतदान जागुती अशा अनेक विषयांची हाताळणी घेत विधारथ्यानी सादर केले.महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन वाहतुकीला कुठलीही अडचण निर्माण न होऊ देता अगदी व्यवस्थितरित्या ही रैली आरमोरी मार्गावरून इंदिरा गांधी चौक, पुढे शहरातील मुख्य मागांने मार्गक्रमण करत पुन्हा सभागृहात संपन्न करण्यात आली.





वेशभूषातुन साकारली नागपुर विभागतिल संस्कृति

या रैली मधे आकर्षणाचा केन्द्र नागपुर जिल्हा थरला होता या भागातील सांस्कृतिक व ऐतिहासिक रामटेक येथिल राम मंदिर व राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज यांचा वेशभूसेतुन विद्याथ्यांनी जिल्हाचे दर्शन घडविले आहे

Post a Comment

Previous Post Next Post