ओबीसी समाजाच्या न्यायिक मागंनिसाठी अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पाला चिमूर क्रांती भूमीतून सुरुवात..- अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन
बात्मी संकलन नीकेश वानखेडे चंद्रपुर
ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 दिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागन्यासाठी रविंद्र टोंगे. विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी 11 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडलासोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे. चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रलीच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलक अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांना तहसील कार्यालयच्या बाजूला उपोषण मंडपात उपोषणाला बसविण्यात आले यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन रांजूरकर. राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर. ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम लेडे. राष्ट्रिय ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, दिनेश कष्टी. माधव डूकरे. अशोक सोनटकके. मारोती अतकरें. चिमूर चे तालुकाध्यक्ष उपस्थित होते