माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्या वर गोळीबार
आरोपी फरार, गोंदिया शहरात दहशित चे वातावरण.
गोंदिया, दि. 11 जानेवारी 2024 : गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या यादव चौक या ठिकाणी आज 11 जानेवारी रोजी अंदाजे 11 वाजता गोळीबार झाली आहे. माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर ही गोळीबार करण्यात आली आहे. दरम्यान लोकेश यांच्या पाठीवर गोळी लागली आहे. त्यांना गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र यादव गंभीर जखमी असल्याने नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर गोळीबार नंतर गोंदिया शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या चात्यानी रूग्णालयात एकच गर्दी केली आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. यावेळी गोंदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की ज्यांना गोळी लागली आहे. ते सध्या स्थितीत चांगले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन काम करीत आहेत. तर कुणीही अफवा पसरवू नये. या घटनेची पर्शभुमी काय आहे. ते आदी लक्ष्यात घेणे महत्वाचे आहे.