उपराष्ट्रपतींच्या हस्ते गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार
बात्मी संकलन सुमीत ठाकरे/गोंदिया
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यांचे शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील शालेय व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन ९ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी एसएससीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त गुजराती नॅशनल हायस्कूल गोंदियाची संश्रुती सत्यशील चव्हाण,एस. एस. सी.मध्ये सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेली काजल जयपाल रुखमोडे, एचएसएससीमध्ये एस. एम. पटेल कनिष्ठ 5 महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्यात न सर्वाधिक गुण प्राप्त करणारी दिव्या ताकेश पहिरे, विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथील पर्व अजय अग्रवाल व राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त एस. एम. पटेल कनिष्ठ महाविद्यालय येथील लक्ष्य नीरज अग्रवाल, बी.ए.मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक गुणप्राप्त एम. पी. महाविद्यालय, देवरी येथील अश्मिता सुरजलाल कोसरकर, बी.कॉम. मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक गुणप्राप्त एन.एम.डी महाविद्यालयातील मेघा सुशील चौरसिया, बी. एस्सी. मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक गुणप्राप्त धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथील प्रियांशी महेशसिंग राठोड तसेच भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवले आहेत, यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या दरम्यान कृषी प्रदर्शनीचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे.