ॲड .राजेंद्र महाडोळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचा भाजपामध्ये प्रवेश
ॲड.राजेंद्र महाडोळे हे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून चंद्रपूर 2019 मध्ये चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्य मिळवले होते .सामाजिक व राजकीय क्षेत्रात विकास करण्यासाठी विचाराच्या लढाई सोबतच विकासा च्या विचाराची लढाई चा विचार सुद्धा महत्त्वाचा आहे .समृद्ध शेतकरी सक्षम महिला व महाराष्ट्रात सर्वोत्तम शिक्षण व सक्षम तरुण व सशक्त उद्योग उभे करावयाचे असल्यास सर्व उपेक्षित वंचित समाजातील घटकांना सोबत घेऊन विकास हा तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी ही सशक्त विकासाला प्राधान्य देणारी देशातील एकमेव पार्टी असल्यामुळे विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून विविध जातींना सुद्धा राजकीय न्याय मिळाला पाहिजे. या हेतूने ऍड .राजेंद्र महाडोळे यांच्यासोबत ..कोळी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आदिवासी गोंड गवारी समाज संघटना महाराष्ट्र राज्य ,सोनार सेवा महासंघ व अखिल भारतीय माळी महासंघाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आज दिनांक 13/ 2 /2019 रोजी मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला यात प्रामुख्याने आदिवासी गोंड गवारी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माधव कोहळे ,महासचिव महासचिव नंदकिशोर नेहारे ,अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी अमोल दादा गुरनूले,राजेंद्र मांदाडे,विठ्ठलराव नागतोडे, राम भेंडारे ,कोळी समाज संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राजूभाऊ बललूरवार ,अमोल गुडडलवार ,सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, सतीश हिंगोलीकर, विकास जावळकर ,आदी शकडो पदाधिकाऱ्यांनी आज रोजी प्रवेश घेतला आहे व येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्रातील पाच हजार कार्यकर्त्यांसह प्रवेशाचा संकल्प आहे असे मत ऍड.राजेंद्र महाडोळे यांनी व्यक्त केला.