आंतरराष्ट्रीय अपराजित योद्धा- छत्रपती शिवाजी राजे
छत्रपती शिवाजी राजे देशापुरते नाहीतर आंतरराष्ट्रीय योद्धा होते??? *होय* त्यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत-
*राजे छत्रपती शिवाजी महाराज* यांनी स्वराज्याची स्थापना केली व रयतेचे राज्य आणले यामध्ये अनेक युद्ध लढाया त्यांनी स्वकीय बरोबरच परकीय शक्तीसोबत लढल्या यात आदिलशाही, निजामशाही,मुघलशाही, कुतुबशाही, इंग्रज, डज, पोर्तुगीज, तसेच युरोपियन सत्ते विरुद्ध लढा लढला... शिवाजी राजे यांच्या आयुष्यात ज्या लढाई लढल्या त्यामध्ये मुख्यतः रायगड युद्ध, तोरणा लढाई,तंजावर लढाई, पावनखिंड लढाई,प्रतापगड युद्ध, पुरंदर लढाई, सोलापूर लढाई, उमरखेड लढाई,शिंदे वंश लढाई,सुरत, कल्याण, पूर्व, पश्चिम,दक्षिण उत्तर मोहीम या लढाया जिंकल्या.1665 ते 1674 या 9 वर्षात 343 किल्ले जिंकले. छत्रपतीच्या राज्याभिषेक वेळी 1674 ला 360 किल्ले स्वराज्यात होते. स्वदेशी-निर्मित युद्ध सामग्री, जहाज,तोफा, तोफगोळा,दारूगोळा, शस्त्र कारखाने, सुसज्ज घोडदळ, पायदळ, अरमार, नेव्ही, युद्ध पारंगत सैन्य, फलटण स्वतः तयार केली होती. समुद्री 85 सरक्षक किल्ले उभारणी केली.
प्रत्यक्ष लढाई करणाऱ्या योद्धात *भारतीय* दोन होते त्यातील एक अफजल खान (प्रतापगड पायथ्याशी लढाई ) व दुसरा मिर्झाराजे जयसिंग (कोढाणा -सिहंगड लढाई ). बाकी *परकीय* बाहेर देशातील यात लाल महाल या ठिकाणी बोटे कापली तो शाहिस्तेखान- *तुर्कस्तानचा* नवाब होता, पन्हाळा व पावनखिंड लढाईतला सिद्धी जोहर, सिद्धी सलामत, सिद्धी मसूद- *इथोपिया* चे होते, बहलत खान पठाण, सिकंदर खान पठाण - *इराण* चे , दिलेरखान *अफगाणिस्तान* चे ,कर्तलब खान- *उजबेकीस्थान* चे -सोव्हीयत रशिया, शत्रूला शस्त्र व तोफखाना पुरवणारे इंग्रज व्यापारी अधिकारी-इंग्लंड *युरोप* चे होते , दारूगोळा पुरवणारे पोर्तुगीज - *पोर्तुगाल* चे होते, दक्षिणेत स्त्री-पुरुष गुलामीचा व्यापार करणारे *डच* अशा परकीय सत्त्ताविरोधी आंतरराष्ट्रीय सैन्य-अधिकारी -योद्धांविरोधी गनिमी कावा, युद्धनीती, रणनीती,चातुर्य व चाणख्य बुद्धीने अनेक लढाया लढल्या व जिंकल्या...
आजही याच शिवाजी राजे यांच्या युद्धनितीचे सराव-कवायती *123* देशा-देशांमध्ये पार पडल्या जातात. *उदा*.
मित्र शक्ति सराव (भारत- श्रीलंका)
मैत्री व्यायाम सराव (भारत- थाईलैंड)
युद्ध अभ्यास सराव (भारत- संयुक्त राज्य अमेरिका)
गरुड़ शक्ति सराव (भारत- इंडोनेशिया)
शक्ति अभ्यास (भारत- फ्रांस) दरम्यान लष्करी सराव घेतले जातात... म्हणून छत्रपती शिवाजी राजे यांना *'व्यवस्थापनाचे गुरु*' म्हणतात.
जगातील 123 देशाचे आदर्श व्यक्तिमत्व "*शिवाजी महाराज द ग्रेट मॅनेजमेंट गुरु*" आहेत
निमित्त 394 जयंती विशेष छत्रपती शिवाजी राजे जयंती महोत्सव
जय शिवराय 🙏🙏
लेखक :
श्री तुकाराम शिवाजी तुरेकर
शिक्षक
आदर्श विद्यालय आमगाव
9960106656