अजित पवार गटाला मिळाला `पक्ष आणि चिन्ह शरद पवार गटाला मोठा धक्का
गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कधी नव्हे तेवढे राजकीय वाद सुरु आहेत. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी देखील दोन गट पडले होते. अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपसोबत हातमिळवणी केली होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह दिलं आहे.