स्वच्छ देवरी,सुंदर देवरी; राहिली फक्त फलकापुरतीच...!

   देवरी नगरपंचायत परिसर कचऱ्याच्या छायेत...



       प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चक्क जि.प. प्राथमिक शाळा , समुह साधन केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रवेशद्वारावर तयार झाला “डम्पिंग यार्ड”, स्वच्छ सर्वेक्षण फक्त नावा पुरतेच ?देवरी ११: नगरपंचायत देवरी द्वारा स्वच्छ सर्वेक्षण नुकतेच पार पडले असून, विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली परंतु दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे . ओला कचरा , सुखा कचरा स्वच्छता विल्हेवाट लावण्यासाठी QR कोड सुद्धा बसविण्यात आले.सविस्तर असे कि देवरी येथील मधोमध जिप प्राथमिक शाळा , समुह साधन केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती च्या दर्शनी भागात चक्क ‘डम्पिंग यार्ड’ तयार झालेले असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष का जात नाही? असा सवाल उपस्थित होत आहे .प्लास्टिक , बाजारातील कचरा, सलून वेस्टेज, घाणेरडा कचरा बाहेर टाकल्यामुळे हवेच्या प्रवाहासोबत सदर वेस्टेज शासकीय कार्यालयासमोर येतो त्यामुळे विद्यार्थी , कर्मचारी , नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही .नगरपंचायत प्रशासन ऊठ जागा हो, लोकांचा आरोग्याचा धागा हो..    देवरी शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ होत आहे.शहरात जागेचा अभाव झाल्यामुळे,लोक वाटेल त्याठिकाणी राहणीमान करू लागले.उदरनिर्वाह करण्यासाठी "मिळेल तेथे जागा" यानुसार दुकाने थातू लागले. वाढत्या शहरीकरणामुळे देवरी शहरात जागोजागी ओला सुका कचऱ्याने ग्रासले आहे. जागोजागी फेकलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याची चिंता नागरिकांमध्ये भेडसावत आहे. म्हणून नगरपंचायत प्रशासन ऊठ जागा हो, आरोग्याचा धागा हो.. असे शहरवाशीयांनी आर्त हाक दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post