करिअर कट्टा विभागीय स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न..
सुमीत ठाकरे/नागपुर
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत युवकांच्या सर्वागीन विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकदिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन आणि विभागीय स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्याचा पुरस्कार वितरण सोहला शनिवार, दि. ०२ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर,
नागपूर येथे पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उदय निर्गुडकर स्वतंत्र संचालक, NHPC, व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष चव्हाण सहसंचालक, उच्च शिक्षण नागपूर विभाग, नागपूर ,प्रफुल्ल पाठक सेक्रेटरी, पावर सेक्टर स्कील कौन्सिल प्रामुख्याने उपस्थित होते . व ही कार्यशाळा आतिशय सुंदर रित्या पार पाडन्यात यशवंत शितोळे आध्यक्ष महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख,प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे ,प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे,अजयकुमार मोहबंसी,. डॉ. ईश्वर मोहूले,डॉ. ज्ञानेश्वर म्हशाखेत्री,डॉ. एल.एस.लडके,डॉ. प्रमोद काटकर आणी करियर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक राजेन्द्र मोटघरे यांचे मोलाचे योगदान होते.