आमगाव येथे १८ एप्रिल ला श्रीराम जन्म उत्सवाची भव्य यात्रा
आमगाव :- आमगाव येथील श्रीराम जन्म उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आले आहे. यावर्षी पूर्वीपेक्षा अधिक विविध दर्शनिय झाकी समाविष्ट करण्यात आले आहे . १८ एप्रिल ला सायंकाळी ४ वाजता भगवान श्रीराम जन्म उत्सव यात्रा साहित्य मंडळ रीसामा परिसरातून होणार आहे.भगवान श्रीराम जन्म उत्सव समिती द्वारे नियोजीत शोभायात्रेत असाटी महिला मंडळ द्वारे अयोध्येतील श्रीराम परिवार,सुरभी गौशालाच्या वतीने विश्वामित्र यग्य,गुजराती महिला मंडळसीता राम विवाह, अग्रवाल महिला मंडळ वन वन गमन,शक्ती ग्रुप सरयु पार केवट भैया, खंडेलवाल महिला मंडळ भरत मिलाप चित्रकूट,गुप्ता महिला मंडळ मतंग मुनी (शवरी),राजपूत महिला मंडळ रामेश्वरम् स्थापना,गायत्री परिवार आमगाव अशोक वाटिका, माहेश्वरी महिला मंडळ मेघनाथ शक्ती बाण, ब्राम्हण महिला मंडळ वाल्मिकी आश्रम लव कुश सीता झाकी दर्शन घेऊन यात्रेत सहभागी होणार आहेत. श्रीराम जन्म उत्सव यात्रा ही १८एप्रिल यात्रेत आकर्षित यावेळी यात्रेत शिव तांडव दर्शन,राधाकृष्ण रासलीला झाकी,बाहुबली हनुमान ,श्रीराम जी, वानर,काली मां तांडव , मोटु पतलू सह विविध दर्शन यावेळी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहणार आहे.यात्रेचे प्रारंभ सायंकाळी ४ वाजता साहित्य मंडळ रीसामा येथील प्रांगणातून प्रारंभ होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक आमगाव भ्रमण करीत गांधी चौक नटराज मार्ग परिसरातून श्रीराम पंचायती मंदिर येथे एकत्रीकरण होईल . यावेळी श्रीराम पंचायती मंदिर येथे पूजन व महाआरती करण्यात येईल . यावेळी उत्सव समिती द्वारे महाप्रसाद वितरण करण्यात येईल. आयोजीत श्रीराम जन्म उत्सव यात्रेत विविध भागातून भ्रमण होत असताना स्वागत गेट व भाविकांसाठी विविध प्रकारचे खादयपदार्थ,शीतपेय, जल सुविधा नागरिकांनी केली आहे. राम जन्म उत्सव यात्रेत मागच्या वर्षी पेक्षा अधिक जनसागर उपास्थित होनार आहे. यासाठी विविध उपाय योजना उत्सव समिती व पोलीस वाहतूक विभागाने केले आहे.