गोंदिया जिल्हातील काजलची युपीएससीत भरारी

 


गोरेगावच्या काजलची युपीएससीत भरारी 


गोंदिया, जिल्ह्यातील गोरेगाव येथील काजल आनंद चव्हाण या विद्यार्थिनीने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून तीने या परिक्षेत ७५३ वी रँक प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे, काजल ही गोंदिया जिल्ह्य़ातून चर्मकार समाजातील युपीएससी उत्तीर्ण करणारी पहिली विद्यार्थीनी आहे. काजलचे वडील व्यवसायिक असून आजोबा बी.टी. चव्हाण हे सेवा निवृत्त केंद्र प्रमुख तर मोठे वडील कमल चव्हाण हे सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत पदवीधर शिक्षक आहेत. काजल ही प्रशासकीय सेवेत जावे ही तिच्या आजोबांची इच्छा आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काजलने अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त केले आहे. तर काजलचा लहान भाऊ नेहाल हा इंजिनियर असून तो देखील युपीएससीची तयारी करीत आहे. तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण गोंदियाच्या एका खासगी शाळेत झाल्यानंतर तिने ११ वी व १२ वी पर्यंतचे शिक्षण गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून केले. यानंतर गोरेगावच्या जगत महाविद्यालयात विज्ञान व कला शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिल्ली येथे यूपीएससीची पुर्वपरिक्षेची तयारी केली. व ऑनलाइन अभ्यास करून युपीएससी उत्तीर्ण करणारी चर्मकार समाजातून गोंदिया जिल्ह्यातील पहिली विद्यार्थीनी ठरली. काजल ला परिक्षा उत्तीर्ण करण्यात जगत महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांनी तिला विशेष मार्गदर्शन केल्याचे काजलचे मोठे बाबा कमल चव्हाण यांनी सांगितले. काजलने युपीएससी परिक्षा उत्तीर्ण करून ७५३ वी प्राप्त केल्याने गोरेगाव शहरासह संपूर्ण तालुकावासियांकडून व समाज बांधवांतर्फे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post