भूकंपाच्या धक्क्यातून सावरत नाही की नागपुरात चौथ्यांदा भूकंप

नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन


नागपूर : गेल्या आठवड्यात लागोपाठ तीन दिवस बसलेल्याभूकंपाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच बुधवारी पुन्हा हादरली. यावेळी भूकंपाचे केंद्र कामठी व कोराडी परिसर होते. सौम्य स्वरूपाच्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.४ इतकी नोंदविण्यात आली. नागपूर जिल्ह्यामध्ये या आठवड्यात बसलेला हा चौथा भूकंपाचा हादरा होता.माहितीनुसार, दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाचे धक्के कामठी व कोराडीसह दिघोरी, कापसी बुजूर्ग, महालगाव व लिहिगाव या गावांमध्ये जाणवले.रिश्टर स्केलवर २.४ इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पाच किलोमीटर आत होते. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातही या भूकंपाची नोंद करण्यात आली. यापूर्वीच्या तिन्ही भूकंपाप्रमाणे हाही भूकंप सौम्य स्वरूपाचाच होता. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, तसेच कुणाला कंपनही जाणवले नाही.जिल्ह्यातील नागरिकांना यासंबंधी अभ्यास केला जाणार असल्याने घाबरण्याची गरज नसून सावधगिरी म्हणून थोडी खबरदारी घ्यावी, अधिक माहितीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post