ज्याचे मृत्यू प्रमाणपत्र सादर केला त्यालाच पोलिसांनी जिवंत न्यायालयात केला हजर
गोंदिया. आज दिनांक 26 एप्रिल रोजी गोंदियाच्या CJM न्यायालयाने दोन आरोपींना 5 वर्षे तुरुंगवास व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून न्यायालयाची फसवणूक व दिशाभूल केली आहे. प्रवीण सुभाष गभणे (30, रा. तुमसर), श्रीकांत भैयालाल मोरघरे (44, रा. तुमसर जि. भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. व्यवस्थापक जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या वतीने मेथिलाल ब्रिजलाल भंडारी (48) यांनी 2 ऑक्टोबर 2017 रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती की, 13 जून 2017 रोजी अंतिम निर्णयादरम्यान श्रीकांत भैय्यालाल मोरघरे यांना 10 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. आरोपीने व्यवस्थापक जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या विरुद्ध अपील केले असता आरोपी सदर अपीलासाठी गैरहजर होता. दरम्यान, हनुमान नगर, तुमसर येथील रहिवासी प्रवीण सुभाष गभणे यांनी आरोपी श्रीकांत भैयालाल मोरघरे याचा मृत्यू दाखला न्यायालयात सादर केला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला जिवंत न्यायालयात हजर केले.खोटे मृत्यू प्रमाणपत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल करून आरोपींनी फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे ग्राह्य धरून आरोपी प्रवीण सुभाष गभणे व श्रीकांत भैयालाल मोरघरे या दोघांना ५ वर्षे तुरुंगवास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर यांनी केला. सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील कमलेश दिवेवार यांनी न्यायालयाचे कामकाज पाहिले. हवालदार ओमराज जामकाते, कॉन्स्टेबल किरसान यांनी बाजू मांडली.