वर्गमित्र स्नेह मिलनाचे कार्यक्रम संपन्न..
नांदेड बातमीदार..
जिल्हा परिषद हॉयस्कूल ईस्लापूर येथील शैक्षणिक वर्ष सन १९९७-१९९८ मधिल दहावीच्या वर्ग मित्रांनी नुकतीच निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील अतिथी हॉटेलमध्ये दिनांक २९ मे २०२४ रोजी केले होते. सदर कार्यक्रमासाठी १९९८ च्या बॅचचे इयत्ता दहावी मधील एकूण ३४मुलं आणि मुली एकत्र जमले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंगद माकणे, प्रदीप कांबळे, आणि सारिका वरवंटे, या तिघांनी पुढाकार घेऊन ३४ मित्र-मैत्रिणींना एकत्र करण्याचा अभुतपूर्व योग घडून आणला.या तीनही आयोजकांचा सत्कार जगदीप हनवते, यांनी केला व तत्कालीन शैक्षणिक वर्षात कसल्याही पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होत नव्हता तरीही या तिघांनी सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी कसोटीने प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सारिका वरवंटे, नी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या मनोगतातून व्यक्त केली. त्यानंतर सर्व उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. प्रत्येकाने आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद हॉयस्कूल ईस्लापूर विषयी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या अनुभवातून संघर्ष आणि यश या दोन्ही बाजू मांडल्यात. सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षक बालाजी माकणे, घोडके , गंगासागर , किरकन , कांबळे , वरवंटे , मंगनाळीकर , होनराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या बॅच-मधील विद्यार्थी शास्त्रज्ञ, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस, समाजसेवक, तज्ञ शेतकरी, व्यावसायिक आणि चांगले नागरिक बनलेत हे त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाले. संबंधित कार्यक्रमाचे संचलन आणि आभार प्राध्यापक डॉ. प्रकाश शिंदे यांनी मानले.