शाळा व वन विभाग ईस्लापुर येथील वनपरीक्षेत्र अधीकारी सचिन धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली.येथील शाळेत वृक्षारोपन करण्यात आले..
बातमीदार /प्रमोद जाधव नांदेड
वृक्ष ही असा एक मित्र आहे तो निस्वार्थपणे फळ फुल देतो. त्यामुळे काळानुसार पर्यावरणात वृक्षाची संख्या टिकवण सजीव पशु पक्षांसाठी जास्त गरजेचे आहे. नाहीतर येणाऱ्या पिठांसाठी हे विनाशकारी ठरूशकते वाढत्या उष्णतेचे विचार करत हे उपक्रम प्रत्येक गावकऱ्यांनी राबवलं पाहिजे. शासनाने एक पेड माँ के नाम आशा योजनेचे आदेश राज्यभर दिला आहे.प्रत्येकाने किमान एक झाड लावणे गरजेचे आहे. असे कर्मचारी सय्यद अकबर यांनी मुलांना मार्गदर्शन करतानी बोलत होते.. आज ता १९. रोजी ईस्लापूर येथील जिल्हा परिषद नवीन शाळा सावरकर नगर, येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात वृक्षा विषयी सर्वच मान्यवरानी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी माजी सरपंच देविदास पळसपुरे ,सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे, वनपाल गुद्दे, वनरक्षक सय्यद अकबर, ग्रामसेवक गर्दसवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाकलवाड, प्रशांत डांगे, मुख्याध्यापक अडबलवार मॅडम, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव दिलीप रायफलवार, शिक्षक पांडे, तोंडारे, पप्पू पळसपुरे, उत्तम जाधव, पत्रकार इमरान घोडके, गणेश यमलवाड, किरण वानखेडे, वाठोरे, आदी गावकरी उपस्थित होते..