ईस्लापूर शहरातील अवैध धंदे बंद करा -गोविंद बैनवाड

 ईस्लापूर शहरातील अवैध धंदे बंद करा .येथील सामाजिक कार्यकर्ता गोविंद बैनवाड यांची मागणी.



नांदेड प्रतीनिधी 

इस्लापूर शहरात छुप्या पद्धतीने काही दिवसापासून चालू असलेल्या मटके ,जुगार अवैध धंदे यांना तात्काळ बंद करा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ता गोविंद बैनवाड यांनी येथील ईस्लापुर पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.अनेक कुटुंब उध्वस्त होऊन उघड्यावर येत आहे. तसेच चोरीचे प्रमाण मारामारी गुंडागर्दी आदि गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच वाढत आहेत .त्यामुळे ही सर्व बाब लक्षात घेता येतील छुप्या पद्धतीने चालणाऱ्या मटके अवैध धंदे आदि बंद करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post