सचिन नाईक यानी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची पाहणी केली..
नांदेड बातमीदार
दोन दिवसाखाली झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जलधरासह दोन मंडळातील परिसरात पावसाने थैमान घातले होते. नाला लागत असलेल्या शेती पूर्णच खरडून गेल्या होत्या. त्या अनुषंगाने परिसराची पाहणी केली असता नुकसानग्रस्त शेतकऱ्याना वरीष्ठाना बोलुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करणार
असल्याची माहिती येथील शिव सेना कार्यकर्ता सचिन नाईकानी पत्रकाराना दिली. दिनांक १९ रोजी इस्लापूर, शिवणी, जलधरा, परिसरातील कार्यकर्ताना येणाऱ्या विधानसभेसाठी काही सूचना व बैठका घेण्यासाठी त्यांनी नुकतीच येथे हजेरी लावली असून, त्यातच बळीराजावर नैसर्गिक संकटाची अपदा आल्याने शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही करणार आहे. परिसरातील काही लोकांनी सिंचन तलाव, खोलीकरण ,बंधारे, करून द्या अशी मागणी केली तर काहींनी माहूर ते बासर आणि शिवणी ते कुबेर आणि किनवट ते भैंसा अशा बस सेवा सुरू करून द्याव्यात अशी विनंती त्यांच्याकडे केली .तसेच काही महिलांनी लाडकी बहीण योजना संदर्भात अडचणी येत असल्याचे सांगितले असता सचिन नाईकांनी व्यक्तिक स्वयंखर्चाने मोफत फॉर्म भरून देऊ अशी हमी घेत शिवणी येथे त्यांच्या कार्यालयात एक तरुण सुशिक्षित फॉर्म भरून घेण्यासाठी नेमणूक करणार असल्याची माहिती दिली. सर्व महिलांनी या संधीचा फायदा घ्या त्यामुळे महिलांना होणारा त्रास कमी होईल असे ते बोलले.