रिन्यू एनर्जीने सौर प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या योजना नाकारल्या.

Mazamaharastra news network

गोंदिया : (GONDIA) नागपूरमध्ये प्रस्तावित 15,000 कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा खुलासा रिन्यू एनर्जीने केला आहे. कंपनीने मीडियात आलेल्या या दाव्यांना फेटाळून लावले (The company denied these claims in the media) असून, महाराष्ट्रातच प्रकल्प सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.रिन्यू एनर्जीने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, "महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. हे सर्व वृत्त संपूर्णपणे खोटे आहे." कंपनीने स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा आमचा दृढ निर्धार आहे. (We are determined to invest in solar energy sector in Maharashtra)सध्या महाराष्ट्रात 550 मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवलेली असून, 2000 मेगावॅटचा नवीन प्रकल्पही सुरु आहे, जो 2026 पर्यंत पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याशिवाय, पंप स्टोरेज आणि ग्रीन डायहायड्रोजन या क्षेत्रातही कंपनीने गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात 30,000 नवीन रोजगार निर्माण होतील. (30,000 new jobs will be created) कंपनीने असेही सांगितले की, आम्ही महावितरणला स्पर्धात्मक दरात 550 मेगावॅट वीज पुरवतो आहोत, आणि आगामी प्रकल्पांसाठी 1 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होईल. (1 lakh crore will be invested)त्यामुळे, सौर प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही सत्य नाही.

Post a Comment

Previous Post Next Post