अतिक्रमण जागेचा गैरफायदा: आमगाव येथे विक्रीचा गैरप्रकार
गोंदिया: Gondia आमगाँव आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालय परिसरात वन विभागाच्या जागा आणि फुटपाथवरील अतिक्रमण केलेल्या भूखंडांचा गैरफायदा घेत काही व्यक्ती या जागा आपल्याच मालकीच्या असल्याचे भासवत विक्री करत आहेत(Some individuals are selling these places pretending that they own them). प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा विक्रीचा गैरप्रकार वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.वन विभागाच्या हद्दीत असलेल्या या जागांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे (Since the administration has no contrL)स्थानिक नागरिकांची फसवणूक होत आहेत. या अतिक्रमित जागा खरेदी करणारे नागरिक भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जाऊ शकतात. जर या प्रकारावर त्वरित कारवाई केली नाही, तर अतिक्रमणाचा प्रश्न अधिक वाढून स्थानिक रहिवाशांच्या हक्कांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. तथापि, अद्याप कुठलाही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नगर परिषद, तहसिलदार कार्यालय आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करणे गरजेचे आहे, कारण याबाबत स्थानिकांमध्ये हफ्ते घेण्याच्या अफवा पसरल्या आहेत, ज्यामुळे प्रशासनाकडे या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.