पहिल्यांदाच आमगाव पोलिसांची मोठे कारवाई जिल्हात सर्वत्र चर्चा

 


गोंदिया: GONDIA आमगाव तालुक्यातील पाउलडोना येथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली, ज्यामध्ये कत्तलखान्यात नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या शेकडो जनावरांची सुटका करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. एका खासगी मालकीच्या जागेवर तीनाचे मोठे शेड तयार करून या जनावरांना अत्यंत वाईट परिस्थितीत कोंडून ठेवण्यात आले होते. या ठिकाणी विविध प्रकारच्या  जनावरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली आणि सर्व जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी जवळपास शंभराहून अधिक जनावरांना मुक्त केले आहे. हे जनावर कत्तलखान्यात नेण्याची तयारी होती, मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांची सुटका झाली. जनावरांच्या सुटकेनंतर त्यांची तात्पुरती व्यवस्था शेतकरी आणि स्थानिक गोशाळांमध्ये करण्यात आली आहे.या प्रकरणात प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तिरुपती राणे यांनी सांगितले की, "ही माहिती आम्हाला विश्वसनीय स्रोतांकडून मिळाली होती आणि आम्ही तात्काळ पथक तयार करून कारवाई केली. जनावरांना वाचवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट होते."स्थानिक लोकांनी या धाडसाठी पोलिसांचे कौतुक केले असून, जनावरांची कत्तल थांबवून त्यांना मुक्त केल्याबद्दल आभार मानले आहेत. या घटनेनंतर जनावरांच्या तस्करी आणि कत्तल खाण्यात नेणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलण्याची मागणी देखील होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post