आमगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईवरून तापले जील्हाचे राजकारण
गोंदिया: GONDIA आमदारांच्या पत्रावरून सकाळी पाळीत शाळा ठेवणाऱ्या आमगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यावर जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम यांनी निलंबनाची कारवाई केली. तर सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. पण असाच प्रकार तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातसुद्धा घडला असताना तेथील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर याच नियमाने कारवाई का नाही असा सवाल आ. सहषराम कोरोटे यांनी उपस्थित केला असून राजकीय सूडभावनेतून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. यावरून आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.शिक्षक दिन, शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम आमगाव, सालेकसा, गोरेगाव,तिरोडा तालुक्यात पार पडला. या कार्यक्रमासाठी सकाळ पाळीत शाळा ठेवण्यात यावी असे पत्र आमदाराने आमगाव व सालेकसा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यांच्या पत्राचा आधार घेत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा सकाळ पाळीत ठेवली. पण या प्रकाराला राजकीय वळण आल्याने जि. प.च्या स्थायी समितीच्या सभेत याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी मुरगानंथमएम यांनी शिस्तभंग केल्याचे पत्र देत आमगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तर सालेकसा गटशिक्षणाधिकाऱ्यावर येथील कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती आहे.गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार नाहीत तसेच त्यांनी वरिष्ठांची यासाठी परवानगी घेणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे न केल्याने नियमानुसार सीईओंनी कारवाई केली. यात काही गैर नाही. पण आमगाव आणि सालेकसा तालुक्याप्रमाणेच . तिरोडा आणि गोरेगाव येथेसुद्धा असाच न प्रकार घडला. मग तेथील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही केली असा सवाल उपस्थित केला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनावरून विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.