बोदलकसा येथे वनस्पती विज्ञानाची शैक्षणिक सहल

 


दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी A I पटेल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजतर्फे बोदलकसा येथे वनस्पती विज्ञानाची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीचा प्रमुख उद्देश हा होता की, विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची ओळख करून देणे, वनस्पती जमा करून हरबेरियम शीट तयार करणे, आणि त्या वनस्पतींबद्दल सखोल माहिती मिळवणे.या सहलीचे मार्गदर्शन पी. एम. बोंबर्डे सर यांनी केले. यासोबत संस्थेचे संस्थापक एम. एम. मेश्राम सर, प्राचार्य एम. बी. रहांगडाले सर, एम. बी. बिसेन सर, एल. जी. हेमने सर, व्ही. व्ही. बागडे सर, अनमोल मेश्राम सर, मेंढे सर, वहाने मॅडम, बोरकर मॅडम, नागपुरे सर, बिसेन सर आणि तुरकर सर यांनीही मोलाचे सहकार्य केले.ही सहल विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींविषयी प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली.

Post a Comment

Previous Post Next Post