संजयकुमार नंदुरकर यांना जिल्हा आदर्श साधन व्यक्ती पुरस्कार जाहीर!
भंडारा जिल्हा परिषद भंडारा तर्फे दरवर्षी जिल्हा आदर्श शिक्षक/साधन व्यक्ती पुरस्कार दिले जातात.यावर्षी देखील शिक्षक दिनाचे दिवशी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहेत.गटसाधनक केंद्र पवनी येथे साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेले संजयकुमार टिकाराम नंदुरकर यांना जिल्हा आदर्श साधन व्यक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे.संजय नंदुरकर हे विषय साधन एक धाडसी व्यक्तिमत्त्व.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पंचायत समिती पवनी येथे कार्यरत असलेले कोणतेही काम अधिकाऱ्यांनी सांगितलेले पूर्णत्वास नेणारे तन मनाने कार्य करणारे साधन व्यक्ती.शासनाच्या प्रत्येक उपक्रमात मोलाची साथ देणारे कर्मचारी.दि.५ सप्टेंबर रोजी त्यांना जिल्हास्तरीय आदर्श विषय साधन व्यक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचे अनेक उल्लेखनीय कार्य आहेत.जि. प.डिजिटल पब्लीक स्कूल पवनी येथे फक्त ६ पटसंख्या असतांना नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी शाळा आपल्या सहकार्यासमवेत उन्हाळी शिबिर राबवून स्वयं अभिव्यक्ती,नाट्य, नृत्य कला व शैक्षणिक उपक्रम राबवून घरोघरी पालक भेटी घेऊन २६ पट संख्या वाढविली तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात १३०पटसंख्या करण्यात मोलाची कामगिरी पार पाडली.आज ती शाळा डौलाने प्रगतशील म्हणून नावारूपास आलेली आहे. तसेच जि.प.प्राथमिक कन्या शाळा अड्याळ येथे ९ पटसंख्या असताना मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांचे मनोबल वाढवून शिक्षकांच्या प्रयत्नाने आज त्या शाळेचा पट ४१ झालेला आहे.तसेच केंद्र पिंपळगाव येथील संचीत शेषराव दिघोरे जि.प.प्राथमिक शाळा अत्री येथील वर्ग ४ थी च्या शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणून प्रगतशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून घडलेले आहे. त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे श्रेय ते गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा,शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक वासनिक,शेखराम गभणे त्यांचे कार्यालयीन सहकारी,विषय साधन व्यक्ती,विषय तज्ञ,आई.ई. डी,विशेष शिक्षक व त्यांची सहचारिणी पत्नी यांना देत आहेत.