विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय देवरी रोड आमगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 


विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय देवरी रोड आमगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, देवरी रोड आमगांव येथे नेहमीप्रमाणे यंदा देखील वार्षिक स्नेहसंमेलन 2024 चा आयोजन करण्यात आला. दिनांक 19 ऑक्टोबर 2024 पासून ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये क्रिकेट, गोळाफेक, स्लो सायकलिंग, म्युझिक चेअर, बुद्धिबळ यांसारख्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. तसेच विज्ञान व कला प्रदर्शन देखील ठेवण्यात आले होते.दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या स्टेज कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून विद्या निकेतन वेल्फेअर संस्था आमगावचे सचिव श्री. रघुवीरसिंह सूर्यवंशी (बबनसिंग ठाकूर) उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणातील अडचणींवर मात करण्याचे मार्गदर्शन केले.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ए. डी. सिंह यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, मोहबे मल्टी केअर हॉस्पिटल गोंदियाचे संचालक डॉ. विनोद मोहबे यांनी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि योग्य वेळी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी डॉ. मोहबे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. विना लिल्हारे आणि प्रा. जी. एस. लोथे यांनी केले, तर वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख प्रा. पी. आर. दारव्हणकर यांनी आभार प्रदर्शन केले. स्टेज कार्यक्रमात कराओके गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा



 यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या शेवटी यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्या निकेतन वेल्फेअर संस्था आमगावचे सचिव श्री. रघुवीरसिंह सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ए. डी. सिंह यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला, तर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. नरेशकुमार माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माजी विद्यार्थी आणि मेडिकल ऑफिसर, रूरल हॉस्पिटल देवरी रोड, आमगावचे डॉक्टर नवरतन गायधने यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. जी. कटरे यांनी केले, तर वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्रा. पी. आर. दारव्हणकर आणि प्रा. जे. आर. घुले यांनी पुरस्कार वाचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध स्पर्धांचे प्रभारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Post a Comment

Previous Post Next Post