कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे निकाल जाहीर



भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती भंडाराच्या निवडणूका पार पडून आज त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. ज्यात गेल्या अनेक वर्षा पासून कॉंग्रेस चा गढ मानल्या गेलेल्या भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत सेंध लागून १८ पैकी नऊ सीटांवर आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या शेतकरी एकता पॅनलच्या उम्मेद्वारांनी विजय मिळविला आहे. यात सेवा सहकारी संस्था सर्व साधारण प्रतिनिधी म्हणून नामदेव इस्तरी निम्बार्ते व हितेश नामदेव सेलोकर, ग्राम पंचायत सर्व साधारण गटातून नरेंद्र भिवाजी झंझाड व जयराम शंकर वंजारी, ग्राम पंचायत अनु/जाती जमाती मधून शरद मेश्राम, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विजय लिचडे, अडते व्यापारी गटातून विनोद छत्तरलाल थानथराटे व भगवान बावनकर तथा हमाल मापारी गटातून रमा गौरीशंकर भुरे हे विजयी झाले.



Post a Comment

Previous Post Next Post